आपला जिल्हा

शेळी विकल्याच्या वादातून नातवाने आजीचा केला खून. Granddaughter murders grandmother over dispute over goat sale

अंबाजोगाई — शहराजवळ असलेल्या चनई शिवारात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता.या प्रकरणाचा उलगडा करण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले असून शेळी विकल्याच्या वादातून नातवाने बेदम मारहाण करून आजीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‌ सरूबाई हरिभाऊ वारकड वय ६५ वर्षे, रा. चनई, ता. अंबाजोगाई असे मृत महिलेचे नाव आहे. सरूबाई यांचा मुलगा राजेभाऊ ह.मु. वाशी, जि. उस्मानाबाद यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कुटुंबाची चनई शिवारात शेतजमीन आहे. आई सरूबाई यांच्याकडे तीन शेळ्या असून त्यांना चारण्यासाठी त्या दररोज शेतात जात. मंगळवार दि.16 नोव्हेंबर रोजी शेतात गेलेल्या सरूबाई घरी परतल्या नव्हत्या. याबाबत चुलत भावजय संगीता अनंत वारकड यांनी गुरुवार दि.18 नोव्हेंबर ला राजेभाऊ यास कळवले. त्यामुळे आईचा शोध घेण्यासाठी पत्नी छायासह राजेभाऊ शुक्रवारी चनईला आले. दरम्यान, सरूबाई यांचा मृतदेह अमर अनंत वारकड यांच्या पडीक शेतात असल्याची माहिती राजेभाऊ यांना मिळाली. त्यांनी पोलिसांसह सदर ठिकाणी तपासले असता सरूबाई यांचा मृतदेह आढळून आला.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यानच्या काळात चौकशी दरम्यान पोलिसांना सरूबाई आणि त्यांचा नातू राहुल बालासाहेब वारकड यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून राहुलला ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी सरूबाई यांचे शवविच्छेदन झाले असता त्यांचा मृत्यू छातीवर मुक्का मार लागल्याने डाव्या बाजूच्या फासळीचे हाड मोडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दुपारी सरूबाई यांचा अंत्यविधी पार पडला.

शेळी विकल्याच्या वादातून खून

सरूबाई यांच्याकडील तीन शेळ्यापैकी एक शेळी राहुलने अंबाजोगाईच्या मंगळवारच्या बाजारात नेऊन संजय रामकिसन काळे यास विकली होती. याबाबत माहिती झाल्यानंतर सरूबाई आणि राहुलमध्ये वाद झाला. याच वादातून राहुलने सरूबाई यांना छातीवर बेदम मारहाण करून त्यांचा खून केल्याची फिर्याद राजेभाऊ यांनी दिली. सदर फिर्यादीवरून राहुल वारकड याच्यावर कलम ३०२ अन्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी करत आहेत

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close