आपला जिल्हा

बीड पोलिसांची मर्दानगी करुणा मुंडे यांना अटक करण्यात पूरतीच का? खांडे समोर शेपूट का घातलं ? Is the manhood of Beed police enough to arrest Karuna Munde? Why did you put your tail in front of Khande?

बीड — परळीत करुणा धनंजय मुंडे यांनी पाऊल ठेवताच कायदा-सुव्यवस्थेचं कारण पुढे करत राजा रामा स्वामीच्या पोलिसांनी शेपूट वर करत अबलेला जेरबंद करत कायदा सुव्यवस्था काय असते हे राज्याला दाखवून दिलं. तर 34 लाख रुपयांचा गुटखा प्रकरणी गुन्हा नोंद असलेला आरोपी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे राजरोस उजळ माथ्याने फिरत आहे. शिवसेना सचिवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत राजाची यंत्रणा कशी शेपूट घालून आहे. माफियांचे पाय चाटण्यात धन्यता मानत आहे हे सप्रमाण सिद्ध केल्याच चित्र पाहायला मिळू लागला आहे.
करुणा धनंजय मुंडे यांनी परळी शहरात पाऊल ठेवताच ‘राजा’ची पोलीस यंत्रणा सतर्क झाली. करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल असेल याचा साक्षात्कार देखील त्यांना झाला. ओळखीच्या नसलेल्या माणसांना देखील जातीवाचक शिवीगाळ दिली म्हणून ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जेरबंद केले. एवढी मर्दानगी राजा स्वामींनी दाखवली त्यांच्या या तत्परतेचा, कर्तव्यदक्षतेचा व प्रामाणिकतेचा अनुभव संपूर्ण राज्याने घेतला. या कारवाईत सामाजिक न्यायाचे धिंडवडे वेशीला टांगले गेले.

पण हीच कर्तव्यतत्परता प्रामाणिकपणा गुटका माफिया महारुद्र मुळे च्याबाबतीत कधीच दिसली नाही. मुळे राजांच्या नाकावर टिच्चून गुटख्याचा नेट वर्क राजरोस सुरू ठेवत आहे. नवीन आलेले सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांनी आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत दोन गुन्हे मुळे विरोधात दाखल केले. पण माफियांचे पाय चाटण्याचा राजा रामास्वामी वर होत असलेला आरोप पुन्हा एकदा चर्चेला उधाण आणणारा ठरला आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे 34 लाख रुपयाच्या पकडलेल्या गुटखा प्रकरणी पोलिसांना हवा आहे. तीन चार दिवसाचा कालावधी उलटला असला तरी राजा रामा स्वामींची तत्परता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.बीड येथे शुक्रवारी शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. खासदार देसाई शहरात दाखल होताच शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी त्यांचे स्वागत केले. जालना रोडवरील झालेल्या कार्यक्रमातही खांडे मान्यवरांसोबत उपस्थित होते. हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले गुटखा प्रकरणी गुन्हा नोंद असताना देखील राजाच्या यंत्रणेची अटक करण्याची हिंमत झाली नाही. उजळ माथ्याने खांडे ने कार्यक्रमात सहभाग घेतला पोलिसांनी हुजरेगिरी केली. याचा अनुभव देखील आला. करुणा मुंडे प्रकरणात मर्दानगी दाखवणारा राजा रामा स्वामीचा कारभार कसा शेपूट घालणारा आहे. हे देखील पाहायला मिळालं एकंदरच या सर्व प्रकारातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय कसा मिळणार? सामाजिक न्यायाच पारड समान कधी होणार ? महा विकास आघाडीच्या राज्यात न्यायाची बीघाडी अशीच होत राहिली तर न्याय मागायचा कोणाकडे? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close