आपला जिल्हा

जिल्हाधिकारी साहेब, या मुजोर टोल धाडीला आवर घाला ! Collector, stop this Muzor toll line!

खाजगी वाहतूक करणार्‍या गाड्यांना टोल माफ करण्याची प्रवाशांची मागणी

गेवराई  — गेल्या तेरा दिवसांपासून एसटी कामगार संघटनेचा संप सुरूच असल्याने , सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. गेवराई-बीड ला जाण्या-येण्यासाठी केवळ रिक्षा हाच पर्याय आहे. चार चाकी वाहना मधून प्रवाशांची वाहतूक होत नाही. पाडळशिंगी जवळचा टोल नाका त्याला कारणीभूत असून, आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार करून टोल माफ करावा अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.
दरम्यान, टोल गेटमधून जाणाऱ्या रिक्षा चालकांना मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे,या मुजोर टोल धाडीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
राज्यातील एसटी कामगार संघटनेच्या वतीने गेल्या तेरा दिवसांपासून संप सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे, रस्त्यावर एसटीची चाके थांबलेली आहेत. या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पायी चालून शहरात यावे लागत आहे.
रस्त्यावर वाहणे नाहीत. वाहतूकीची साधने नसल्याने प्रवाशांना खाजगी वाहतूकीचा आधार मिळाला आहे. त्यास सरकारने सकारात्मक विचार करून, खाजगी वाहणे आगारात उभी करून प्रवाशांची सोय केली आहे. परंतू , गेवराई-बीड व बीड – गेवराई वाहतूकीसाठी केवळ रिक्षा उपलब्ध आहेत. तीस ते चाळीस रिक्षा रस्त्यावर धावू लागलेत. मात्र, बीडला जायला दीड तास लागतो. चार चाकी वाहनातून प्रवाशी वाहतूक होत नाही. गाड्या तयार आहेत. मात्र, गेवराई-बीड च्या मध्ये पाडळसिंगी जवळ टोल आडवा येतो. बीड आणि गेवराईला जाण्या-येण्यासाठी पन्नास रुपय भाडे आहे. टोलचे भाडे एकशे अंशी रुपये आहे. दोन्हीकडून टोल द्यावा लागतो. त्याची एकूण रक्कम 360 रु होते. एका गाडीत सात सीट बसतात. त्याचे पैसे होतात 350 रुपये. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून गाडी उपलब्ध करून दिली तरी चालकाला उलट दहा रुपये तोटा सहन करावा लागेल. डीझेल चे पैसे ही निघत नाहीत. त्यामुळे, टोल घेऊ नये, अशी गाडी मालकाची,चालकाची अपेक्षा आहे. परंतू , कोटी रुपयांवर डल्ला मारणारे टोल धाडवाले
मुजोरी करून जनतेची लूट करुन सरकारच्या डोक्यात धूळफेक करी आहेत. संपामुळे वाहतूक आणीबाणी सुरू असताना, टोल बंद करण्याची गरज आहे. नागरिकांना वाहतूकीची सोय होईल. सामाजिक भान ठेवून खाजगी वाहतूक करणार्‍या गाड्यांना संप मिळेपर्यंत टोल घेऊ नये, अशी मागणी होऊ लागली आहे.दरम्यान, पाडळसिंगीच्या टोलवर रिक्षाकडून सुद्धा टोल वसूल करण्याचे षडयंत्र सुरू असून, रिक्षा चालकाला टोल गेटमधून लवकर सोडले जात नाही. त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा मुजोर टोल धाडीला जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई होणे आवश्यक आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close