क्राईम

कुमावत यांच्या पथकाने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे बायोडिझेल पकडले Kumawat’s team seized biodiesel worth over Rs 1 crore

               इक्बाल शेख

केज — शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद करत 34 लाख रुपयांचा गुटखा दोन दिवसांपूर्वी पकडला असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 75 हजार लिटर बायो डिझेल जप्त केले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, 18 नोव्हेंबर रोजी सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, मुंबई व पुणे येथून बायोडिझेल घेऊन जाणारे चार टँकर केजमार्गे नांदेडकडे जात आहेत. यावरून कुमावत यांनी दि. 18 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मस्साजोग येथे पथकामार्फत सापळा लावला. त्यावेळी त्यांना एक टँकर आढळून आले. कुमावत यांनी टँकरचा पाठलाग करून ड्रायव्हरला ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता चालकाने टँकमध्ये बायोडिझेल नांदेड येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. चालकाकडून मिळालेल्या माहितीवरून कुमावत यांनी पथकासह थेट नांदेड व लोहा गाठले. नांदेड येथून पथकाने चार टँकर क्र.एमएच 46/जे इ 1106, एमएच-04/ जीएफ- 9873, एमएच- 26 /एच- 8496 , एक स्कॉर्पिओ एमएच- 21 /एएक्स-1356 ,एक कार एमएच-26/टी-9999 ताब्यात घेतले. यावेळी तीन टँकर्समध्ये प्रत्येकी 25 हजार लिटर असे सुमारे 75 हजार लिटर्स बायोडिझेल आढळून आले. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई केज उपविभागीय पोलिस पथकातील बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, विकास चोपणे, सचिन अहंकारे, महादेव सातपुते, राजू वंजारे, सुहास जाधव यांच्यासह परळी पोलीस स्टेशनचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, विष्णू फड आणि किशोर घटमल यांनी केली.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close