महाराष्ट्रसंपादकीय

बाऽऽ उद्धवाऽऽऽ तुमचा कुंडलिका सत्तेचा वापर खिसा भरण्यासाठी करतोय; यात सामान्यांचा जीव जातोय, जनता शिवशाहीचा नाही तर मोगल शाही चा अनुभव घेते आहे.

बीड — सत्ता परिवर्तनाचा फायदा सर्वसामान्य जनतेला कितपत झाला हा संशोधनाचा विषय असला तरी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना मात्र होऊ लागल्याचं बीड जिल्ह्यात पाहायला मिळू लागलं. नेत्यांच्या फायद्या पुढे सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काचं मातेरं होऊ लागलं. ठाकरे (Thackeray) साहेब एकेकाळी शिवसेना ( Shiv Sena  ) सर्वसामान्यांच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरून लढताना दिसत होती. आज मात्र ती स्वत:चे खिसे भरण्यात दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे.शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच पदाचा वापर माफिया गिरी साठी करू लागला आहे. 34 लाखाच्या पकडलेल्या गुटखा प्रकरणी कुंडलिक खांडे (Kundlik Khande) वर गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी देखील त्यांच्या जागेत सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर लॉकडाऊन असतांनाच पोलिसांनी धाड टाकली होती. असे धंदे करणारे जिल्हाप्रमुख सर्वसामान्यांना न्याय कसा देणार ? तुमचं राज्य चांगलं का म्हणायचं? शिवसेना (Shiv Sena) सर्वसामान्यांना आपलीशी का वाटावी असे प्रश्न जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

आज पर्यंत शिवसेना (Shiv Sena) सर्वसामान्यांना आपलीशी वाटत होती त्यामुळेच बीडच्या जनतेनी नेहमीच शिवसेनेला साथ दिली. हिंदु -हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची बीडवर विशेष मर्जी होती. त्यामुळेच निवडणूक काळात राज्यातल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा ते भर सभेत करत असत. पण ही बाब आता इतिहास जमा झाली असून शिवसेनेतील बीडच्या नेत्यांचं चरित्र आणि चारित्र्य दोन्ही बदलल्याचा पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वसामान्य जनता मात्र भरडून निघत आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर जनतेच्या जीवनात थोडासा दिलासा मिळेल अशी आशा होती पण ती धुळीस मिसळली. इथले नेते स्वतःची तुंबडी भरण्यातच मशगुल झाले परिणामी शिवसेना (Shiv Sena) गटातटात विभागली गेली तर जिल्हाप्रमुखा सारखे नेते सत्तेचा वापर जनहितापेक्षा स्वहितासाठी करू लागले. परिणामी कुंडलिक खांडे गुटखा प्रकरणात अडकला गेला. केजचे सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांनी 34 लाखांचा गुटखा पकडला. या प्रकरणात इतर गुटखा माफिया सोबत कुंडलिक खांडे देखील माफिया गिरीत सामील असल्याचं समोर आलं. यापूर्वी देखील कोरोना संकटकाळात संचारबंदी असताना कोरोना चे नियम पायदळी तुडवत खांडे च्या जागेत पत्त्याचा क्लब सुरू असल्याचं पोलिसांनी टाकलेल्या धाडी नंतर उघडकीस आलं होतं. नंतर ही जागा किरायाने दिली होती.त्यामूळे आपला या गोष्टीशी संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यावेळी देखील तुमच्या जागेत काय चालू आहे याची खबर जिल्हा प्रमुख पदावर असलेल्या माणसाला कशी नव्हती यावरून टीकाटिप्पणी झाली होती. यावेळी देखील कुंडलिक खांडे च गुटखा प्रकरणाच सत्य समोर येताच हे षडयंत्र असल्याचा कांगावा करत खांडे फिरू लागले आहेत. जर काही क्षण हे सत्य मानलं तर ठाकरे साहेब तुम्ही सांगा जिथे तुमचा जिल्हाप्रमुख सुरक्षित नाही. तिथे सर्व सामान्य माणसाचा काय असेल? जर ते खरच गुन्हेगार असतील तरीदेखील सर्वसामान्य माणसाचं जीवन या लोकांनी किती हराम केला आहे.याचा विचार आता तुम्हीच करा.पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी देखील जिल्हाप्रमुखा सारख्याला साथ देत आहेत. मग तुमचं हे राज्य कायद्याचं नव्हे तर सत्तेतल्या लोकांच्या फायद्याच असल्याचं जनता म्हणू लागली आहे. सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठीच राजा रामा स्वामी सारखा कुचकामी माणूस जिल्ह्याच्या माथी मारला आहे. जनता त्यामुळे शिवशाहीचा नाही तर मोगल शाहीचा अनुभव घेत आहे. त्यामुळेच बीड जिल्ह्यातली महिला सुरक्षित नाही दरोडे, चोऱ्या ,वाटमारी, जुगार, वाळू तस्करी, गुटखा तस्करी सारख्या गुन्ह्यांनी जिल्हा हादरत आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close