आपला जिल्हा

जे कुमावत यांना जमलं ते राजा रामास्वामी ला का नाही ? 34 लाखाचा गुटखा पकडला सेनेच्या कुंडलिक खांडे वर गुन्हा दाखल Why didn’t Raja Ramaswamy get what Kumawat got? Gutka worth Rs 34 lakh seized, case filed against Sena’s Kundlik Khande

बीड — पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामींचा कारभार माफियांना पोसणारा व स्वतःची तुंबडी भरणारा असल्यामुळे जिल्ह्यात माफिया माफिया राज निर्माण झाले. कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली गेली. टीकाटिप्पणी झाली पण “नाक कापलं तरी दोन भोकं ” तयार म्हणत त्यांच्या कार्यपद्धतीत फरक पडलाच नाही. पण नुकतेच जिल्ह्यात आलेले केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी धाडसी कारवाया करत गुटखा माफियांना आळा घालण्याचं काम सुरू केला आहे. सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे वर 34 लाख रुपयांच्या पकडलेल्या गुटख्या प्रकरणी गुन्हा दाखल करत. राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. कुमावत यांच्या या कारवाईमुळे जनसामान्यांचा उडालेला वर्दी वरचा विश्वास पुन्हा पूर्ववत होऊ लागला आहे. पण राजा रामा स्वामी चा कारभार

” खायला काळ अन् खुर्चीला भार ” असल्याचं मत जनतेतून आता व्यक्त होऊ लागली आहे.
बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे राजाच्या कारकीर्दीत निघाले. बीडचा बिहार करण्याची त्यांची इच्छा असल्याचं आजपर्यंत अनेक वेळा सिद्ध झाला आहे. त्यामुळेच आज पर्यंत माफियांचे पाय चाटण्यात धन्यता मानली. शेवटी विरोधी पक्षाच्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी देखील मुख्यमंत्र्याकडे राजाच्या खाऊ गिरीतून निर्माण झालेल्या माफिया राजची तक्रार केली. पण कितीही ओरड झाली तरी नाक कापलं तरी भोक तयार आहे असं म्हणणारा राजाचा कारभार जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडवणारा आहे. असं असलं तरी पंकज कुमावत यांच्यासारखी चांगली माणसे देखील प्रशासनात असल्यामुळे कायद्यावर थोडाफार विश्वास बसण्यास मदत होणार आहे. केजचे सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी केज तालुक्यातील नांदूर घाट मध्ये दोन ठिकाणी छापे मारत गुटखा पकडला. यामध्ये मंगळवारी संध्याकाळी चंद्रकांत रामेश्वर कानडे व रामहरी वैजनाथ जाधव यांच्या दुकानाचा समावेश होता या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपण तीन जणांकडून गुटखा घेतल्याचं चंद्रकांत कानडे यांने कबूल केलं. तर रामहरी जाधव ने दोन साथीदारांची नावं सांगितली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कानडे कडे आढळलेल्या गुटख्याचे कनेक्शन महारुद्र मुळे शेख वसीम शेख सिराज तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याशी असल्याचा चौकशीत समोर आलं. सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने इमामपूर रोड वरील गोदामावर तसेच जालना रोडवरील गोदामावर धाडी टाकल्या. यावेळी बारा लाख रुपयांचा टेम्पो क्र. एम एच 26 बी ई 19 26 तसेच 20 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तर रामहरी जाधव याच्याकडून एक लाख 97 हजार रुपयांचा असा एकूण 34 लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला. याप्रकरणी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यापूर्वी सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने मांजरसुंबा येथे 13 ऑक्‍टोबरला 57 लाख रुपयांचा गुटका जप्त केला होता याप्रकरणी देखील महारुद्र मुळे वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अडीच महिन्याच्या कालावधीत महारुद्र मुळे वर गुटखा प्रकरणी हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मुळे हा पोलिसांच्या कागदोपत्री फरार असला तरी राजरोस बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात गुटखा रॅकेट चालवण्याचं काम करत आहे. पोलिसांच्या खबऱ्यांनाही मुळे चा सूगावा लागत नाही स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षकांचं विशेष पथक तसेच पोलीस अधीक्षकच त्याला संरक्षण देत असल्याचं जनतेत आता बोललं जाऊ लागलं आहे. पोलीस अधीक्षक साहेब कुठपर्यंत आता “खायला काळ आणि खुर्चीला भार “असा कारभार तुम्ही करणार असून कुमावत यांच्याकडून थोडेफार तरी शिका जनतेच्या खाल्लेल्या मिठाला जागा गुन्हेगारीला आळा घाला अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close