आपला जिल्हा

ईनामी दर्गाह मशिद बरोबरच कब्रस्तानच्या जमिनी बळकावल्या, जिल्हा प्रशासन झोपेचं सोंग करतंय.Land grab grabs along with Inami Dargah mosque, district administration is pretending to sleep

बीड — जिल्ह्य़ातील दर्गाह मशिद आदि धार्मिक स्थळांची बनावट दस्तावेज तयार करून बेकायदेशीर खाजगी व्यक्तीच्या नावे हस्तांतरण करण्याचे प्रकार ताजे असतानाच कब्रस्तानच्या जमिनी बळकाऊन त्यावर कच्ची पक्की घरे बांधण्याचे प्रकार घडत असुन संबधित प्रकरणात तक्रार करून सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.प्रशासनाने झोपेचं सोंग घेतल्यात जमा असून संबधित प्रकरणात जिल्हा वक्फ आधिकारी बीड यांनी पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाला लेखी तक्रार करून ६ महिने झाले तरी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.


बीड शहराच्या मध्यवर्ती भागात वक्फ संस्था तकीया मुताड शाह मस्जिद व ग्रेवयार्ड बीड यांची सर्व्हे नंबर २१ मध्ये २ एक्कर ५ गुंठे जमिन, ज्याची नोंद महाराष्ट्र शासन राजपत्र अनुक्रमांक ८८ पान नंबर १४ व १५ वर असुन सदरील संस्थेचे क्षेत्र ८ गुंठे सर्व्हे नंबर २१ मधिल क्षेत्र २ एकर ५ गुंठे जमिन कब्रस्तान करीता बहाल करण्यात आलेली असून त्याठिकाणी कच्चे व पक्के घरे बांधुन अतिक्रमण करण्यात आलेले आहे.
तक्रारीनंतरही पोलीस प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ
वरील ईनामी कब्रस्तान जमिन खरेदी विक्री करता येत नसुन विना परवानगी घरे बांधणे, कबरी उद्धवस्त करणे कायद्याने गुन्हा असुन मस्जिद व्यवस्थापकाच्या परवानगी शिवाय बांधकाम करणे वक्फ संशोधन अधिनियम कलम ५१ तसेच ५२(२)अ भा.दं.सं.चे कलम २९५ आणि २९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार जिल्हा वक्फ आधिकारी बीड यांनी दि. ९ जुन २०२१ रोजी पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन पेठ बीड आणि मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना देऊन सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. संबधित प्रकरणात दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद यांना करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close