आपला जिल्हा

आय जी साहेब आंधळा “राजा” च्या बेबंदशाहीला आळा घालणार काय ? Will IG Saheb curb the of the anarchy blind “King”?

बीड — आयजी साहेब पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या कारकिर्दीत कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. त्यामुळेच दिल्लीच्या निर्भया पेक्षा भयंकर घटना जिल्ह्यात घडली. अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यात चारशे जणांनी बलात्कार केला. यामध्ये दोन पोलिसांचा देखील समावेश असल्याच पुरवणी जबाबात पीडितेने म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस दलाची मान झुकली गेली आहे. आतापर्यंत वाळू माफिया, गुटखा, जुगार, अवैध दारू विक्री यासारखे धंदे करणाराचेच पाय बकासुराच पोट भरण्यासाठी पोलिसांना धरावे लागत होते. यावरून टीकाटिप्पणी झाली पण राजांच्या कारभारात फरक पडलाच नाही. खाकीचा धाक राहिला नसल्यामुळे जिल्ह्यात अडीच दिवसाला बलात्कार तर सहा दिवसाला खुनाचे प्रकार घडू लागले आहेत. कायदा-सुव्यवस्थेच्या या विस्कटलेल्या घडीला “नीट” करण्याच काम तुमच्या या दौर्‍यात केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या कार्यकाळात पोलीस दलाची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळू लागला आहे. कोरोना संकटकाळात जिथे सर्वसामान्य नागरिकांना बाहेर फिरण्यास मुभा नव्हती त्या स्थितीत वाळू तस्करी गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. पोलीस यंत्रणा अशा लोकांना पायघड्या घालत होती. अवैध दारू धंदे जुगार राजरोस सुरू होते. कायदा-सुव्यवस्थेचा धाक फक्त सर्वसामान्यांसाठी होता. तर माफियांचे कारभार पोलीस संरक्षणात सुरू होते.तुम्ही वाटेल ते करा पण मला माझा महिन्याचा वाटा द्या असा अलिखित आदेश ठाणे प्रमुखांना राजांनी दिलेला आहे.राजा रामास्वामी यांची भूक बकासुरा सारखी असल्यामुळे ती भागवण ठाणे प्रमुखांना देखील अवघड जाऊ लागला आहे. परिणामी ठाणे प्रमुख देखील वाटेल त्या मार्गाने पैसा गोळा करून बकासुरा पर्यंत पोहोचवण्याचं त्याची भूक भागवण्याचं काम करू लागले त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. जिल्ह्यात आता नवे गुन्हेगार सक्रिय होऊ लागले आहेत. चोऱ्या दरोडे,वाटमारी सारख्या गुन्हेगारी घटनांनी जिल्ह्याला हादरे बसत आहेत. निर्भया सारख्या प्रकरणाला देखील लाजवेल अशी घटना घडल्यामुळे तसेच दोन पोलीस देखील यात सामील असल्यामुळे पोलीस दलाची मान झुकली गेली आहे. अल्पवयीन मुलीवर तब्बल चारशे जणांनी अत्याचार केल्याने राज्य हादरले आहे. राजा रामाच्या राज्यात अडीच दिवसाला महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. बालविवाह सारख्या घटना राजांच्या कारकीर्दीत वाढल्या आहेत. इतकंच नाही तर राजांच्या तुघलकी कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांसोबतच पोलीस कर्मचाऱ्यांना देखील बसू लागला आहे. पती पती एकत्रीकरणाचे प्रस्ताव देखील फेटाळत बदल्या केल्यामुळे असंतोषाची ठिणगी पडली आहे. आज पासून बीड मध्ये असलेले आयजी या सर्व बाबींचा आढावा घेणार असून राजा रामा स्वामींच्या ” खल रक्षणाय सद निग्रहणाय” या ब्रीद वाक्याला आळा घालण्याचे काम नक्की करतील. यापुढे माफियांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहील व जिल्ह्यातील जनतेत आयजी ‘प्रसन्न ‘तेच वातावरण निर्माण करतील असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जाऊ लागला आहे

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close