आपला जिल्हा

राज्यातल्या सत्ताधारी पक्षावरच सामाजिक न्यायासाठी आंदोलनाची वेळ , नागरी समस्यांसाठी शिवसेनेचे आमरण उपोषण Time for agitation for social justice on the ruling party in the state, Shiv Sena’s fast till death for civil issues

परळी– राज्यात एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेचे गुलगुले खाणारे पक्ष मात्र स्थानिक राजकारणात जनतेचे प्रश्न घेऊन एकमेका विरोधात दंड थोपटत असल्याचं पाहायला मिळू लागला आहे. विविध नागरी समस्यांसाठी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती असलेली शिवसेनाच परळीत उपोषणाला बसली आहे. जे आपल्या राज्यातील सहकारी पक्षाने नागरी समस्यांसंदर्भात केलेल्या मागणीला निवेदनाला किंवा आंदोलनाला भीक घालत नाहीत ते जनतेला काय न्याय देऊ शकणार असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

परळी नगर परिषदेला कोट्यावधी रुपयांचा निधी या दोन वर्षांच्या काळात उपलब्ध झाला पण नागरी समस्या जैसे थे च असल्याचं चित्र पाहायला मिळू लागला आहे. परळी न.प.ची सूत्र राष्ट्रवादीच्या हातात आहेत
नागरिकांनी प्रदीर्घ काळापासून केलेल्या चाळीस फूट रोड कन्याशाळा रोडला जोडण्याची मागणी, भुयारी गटार योजनेचे रखडलेले काम अन त्यामुळे झालेले जनतेचे हाल, उखडलेले रस्ते अन वाहतूक समस्या, नवीन विद्युत पोल, पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम, अत्यावश्यक ठिकाणी रस्ते करण्याची मागणी अशा विविध विषयांवर अनेक वेळा नागरिकांनी लेखी स्वरूपात, आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या संतप्त भावना प्रशासनाला कळवल्या पण नगर परिषद प्रशासनाने त्याची अद्यापही दखल घेतली नाही. सामाजिक न्यायाची घडी विस्कटलेली असल्यामुळे परळी शहरातील जनतेच्या मूलभूत हक्कासाठी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला.सोमवार दि 15 नोव्हेंबर रोजी परळी न.प.समोर उपोषणास नागरिकांसह सुरुवात केली आहे. आपल्या मूलभूत गरजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक लढा देत असून 22 जून 2021 रोजी परळी नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले असता दोन दिवसीय उपोषणाच्या अंतिम क्षणी पालकमंत्री धनंजय मुंडे, मुख्याधिकारी, न.प गटनेते वाल्मिक कराड यांनी दिलेल्या अश्वासनावर नागरिकांनी आपले उपोषण मागे घेतले परंतु दोन महिन्यात सर्व प्रश्नावर तोडगा काढून कामे केली जातील या अश्वासनावर कोणतीच अंमलबजावणी केली गेली नाही. शिवसेनेची बांधीलकी ही सत्तेशी नसून जनतेशी आहे याचं भूमिकेवर ठाम राहून शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नासाठी आमरण उपोषण करण्याची भूमिका घेतली आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षालाच सामाजिक न्यायासाठी उपोषणाची वेळ आल्यामुळे हा विषय चर्चेचा बनला आहे.या उपोषणास शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्यासह शहर प्रमुख राजेश विभूते, शहर संघटक रमेश चौंडे, जेष्ठ नेते नारायण दादा सातपुते, भोजराज पालिवाल, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, प्रकाश साळुंखे, युवासेना तालुका समन्वयक संतोष चौधरी, खाडे सर राजाभाऊ जाधव, विष्णू लिखे, गुरुलिंग क्षीरसागर, मोहनलाल भुतडा, वाल्मिक आरसुळे, बाळू खोडके, रामेश्वर हंचाटे, वडुळकर सर, अतुल शिंदे, शहर संघटक अनिल शिंदे, हनुमान गायवळ, युवासेना शहर अधिकारी कृष्णा सुरवसे, शहर समन्वयक सुदर्शन यादव, दीपक खाडे, बालाजी शिंदे, मुंजा उबाळे, शिवहार जाधव, प्रदीप देशमुख, विशाल जाधव, गोविंद गरड, गणेश भालेराव, शिवसैनिकासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close