आपला जिल्हा

बोकडासारखा माज दाखवायला कोलप साहेब महावितरण बापाची जहागीर नाही! Kolap Saheb Mahavitaran Bapa’s Jahagir is not there to show off like a fun goat!

बीड — सध्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनलेला असताना त्यांच्या मजबुरीचा फायदा कंत्राटदारा सोबतच अधिकारी उठवू लागले आहेत. कंत्राटदाराच्या चोऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी अधिकारी अरेरावीची भाषा कर्मचाऱ्यांना वापरू लागले आहेत. बीडचा अधीक्षक अभियंता रविंदर कोलप याच्या दलिंदर मनोवृत्तीची कथीत ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होऊ लागली आहे.कोलप सारखा उच्च पदस्थ अधिकारी महावितरणला बापाची जहागीर समजून आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरत अप्रत्यक्षरीत्या कंत्राटदाराच्या चोरीचं समर्थन करत असल्याचं यातून स्पष्ट होतं.

वाचा — अख्खं महावितरण किड्यांनी खाल्लं, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बोनसही गुत्तेदाराने ढापला

https://sahyadrimajha.co.in/10418/

सध्या महावितरणचा बहुतांश कारभार आउटसोर्सिंग च्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे कंत्राटदार व त्यांना साथ देणारे अधिकारी पूर्ण महावितरण पोखरून काढण्याचं काम करू लागले आहेत. परिणामी ऊर्जामंत्र्यांच्या म्हणण्यानुसार महावितरण डबघाईला आले आहे. लाखो रुपये पगार महिन्याला मिळत असला तरी भ्रष्ट अधिकारी कंत्राटदाराने दिलेलं खरकटं खाण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनतेची कंत्राटी कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकायची आशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची मानसिकता संपली आहे. राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत कंत्राटी कर्मचाऱ्यांना 7 हजार 200 रुपये दिवाळी बोनस ( सानुग्रह अनुदान) जाहीर केलं. ते कंत्राटदारांना देण्यात आलं. पण राज्यातील बहुतांशी कंत्राटदारांनी हे दिवाळी बोनस मधल्या मध्येच खाऊन टाकलं. तर काही ठिकाणी फक्त पंचवीसशे रुपये दिवाळी बोनस कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलं. या आर्थिक महावितरणातून झालेल्या घोटाळ्याचा परिणाम अधिकारी देखील कंत्राटदाराला पाठीशी घालत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरून त्यांच्या मजबुरीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू लागल्याच पाहायला मिळालं.

या झालेल्या घोटाळ्याची कैफियत मांडण्यासाठी एका आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांने अधीक्षक अभियंता रविंदर कोलप ला फोन लावला. आमच्या अधिकारावर गुत्तेदाराने कसा डाका टाकला आहे हे सांगण्याचा तळमळीने प्रयत्न केला. पण बोनसचा विषय काढताच कोलपच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. महावितरण आपल्या बापाची जहागीर आहे. त्याचे आपण जागीरदार आहोत आशा ठेक्यात कंत्राटी कर्मचाऱ्याला बोलायला सुरुवात केली. आपण मोठ्या पदावर असलो तरी जनसेवक आहोत किमान माणूस आहोत हे कोलप विसरला. कंत्राटदाराने बोनस च बिल जेवढं सादर केलं तेवढं मी त्यांना दिला आहे. त्यांनी तुम्हाला दिलं किंवा नाही दिलं याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही. तुम्ही आणि ते पाहून घ्या असं म्हणत स्वतःची जबाबदारी अरेरावीची भाषा वापरून झटकून टाकली. मी तुमचं म्हणणं का ऐकून घेऊ? तुमचा माझ्याकडे तक्रार करण्याचा संबंध काय? कंत्राटदाराला पैसे दिलेत माझी जिम्मेदारी संपली? इथून पुढे मला फोन केलास तर याद राख असा शब्दातला माज त्यांनी दाखवला

सध्या बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी पडेल ते काम करावे लागत आहे. महावितरण कंत्राटदाराच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचारी नियुक्त करते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच महावितरणची सर्व मदार अवलंबून आहे. हे कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असले तरी. कंत्राटदार त्यांच आर्थिक शोषण करू लागले आहेत. बोनसचच उदाहरण घेतलं तर 4 हजार 700 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्या मागे कंत्राटदाराने हडपले. आता कंत्राटदाराच्या विरोधात उभे राहावे तर नोकरी जाण्याची बेरोजगार होण्याची भीती. त्यामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अधीक्षक अभियंत्याच्या कानावर ही गोष्ट घालण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. पण कंत्राटी कर्मचाऱ्यांची मजबुरी अधीक्षक अभियंत्याला माहीत असल्यामुळे त्यांची कैफियत ऐकून घेतलीच नाही. उलट अरेरावीची भाषा वापरून त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न कोलप यांनी केला. अधीक्षक अभियंत्याची भाषा ऐकली तर त्यांनी कंत्राटदाराने फेकलेला उष्टा तुकडा खाल्ल्याच प्रतीत होतं. महावितरण कंपनी कंत्राटदारा मार्फत कर्मचाऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात पैसे देतं तर तो पैसा त्यांच्या हातात पडतो किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी अधीक्षक अभियंत्याची नाही काय ? आपण जनसेवक असताना जनतेचे असो की कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी खात्याचा प्रमुख म्हणून यांची नाही काय? कंत्राटदार पोसण्यासाठी व खुर्चीवर बसून अंडे उबवण्यासाठी अधीक्षक अभियंत्यास लाखो रुपये पगार महावितरण कंपनी देत आहे काय? अशा घटनांमधून महा विकास आघाडी सरकार, महावितरण, ऊर्जामंत्री नितीन राऊत बदनाम होत नाहीत काय?असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे लुटणाऱ्या मुने सारख्या कंत्राटदारा विरोधात व हरामखोरी ची भाषा वापरणाऱ्या अधीक्षक अभियंत्या विरोधात महावितरणने कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close