आपला जिल्हा

केज-कळंब रोडवर पहाटे कार मोटारसायकल अपघातात दोन जागीच ठार Two killed in early morning car-motorcycle accident on Cage-Kalamb Road

               इक्बाल शेख

केज — बुधवार दि.10 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान मोटार सायकल ला एका चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत मोटार सायकलस्वारांसह गाडीतील चालक ठार झाला असून मोटरसायकलवरील एक महिला व लहान मुलगा जखमी झाला आहे.

बुधवार रोजी सकाळी ६:०० च्या दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथे शाम तेलंग यांच्या शेताजवळच्या पुलावर एका बलेनो गाडी क्र.एम एच २५— एएस ७५९० ने मोटार सायकलला क्र. एम एच ४४– वाय२१५३ धडक समोरून धडक दिली. यात मोटार सायकल वरील अमोल सत्वधर आणि कार चालवीत असलेला युवक अमित जीवन बाराते वय २२ वर्ष रा. कळंब हे दोघे जागीच ठार झाले.

तर मोटार सायकलवरील सौ. अनुराधा विनोद फुलसुंदर आणि त्यांचा लहान मुलगा चि. आदित्य विनोद फुलसुंदर हे दोघे जखमी झाले आहेत. जखमी अनुराधा विनोद फुलसुंदर व त्यांचा लहान मुलगा चि. आदित्य विनोद फुलसुंदर त्यांच्यावर अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात एवढा भयंकर होता की कार प्रथम पुलाच्या कठड्याला धडकून मोटार सायकलला धडकली असावी. त्या नंतर ती कार अनेक वेळा पलटी खाल्ल्या असल्याने कार चकनाचूर झाल्याचे दिसत आहे. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, संतोष मिसळे, पाचपिंडे, गवळी, गायकवाड, शिनगारे, सानप, शेख, गित्ते, हनुमंत गायकवाड हे सर्व पोलीस कर्मचारी हजर झाले व रुग्णवाहिका चालक घुले व ग्रामस्थ यांनी मदत केली.

दिवाळीच्या भाऊ बिजेला केज येथे आलेल्या बहिणीला तिच्या सासरी सोडण्यासाठी एसटीचा संप असल्याने अमोल तिला व भाच्याला मोटार सायकल वरून बार्शी तालुक्यात सासरी सोडण्यासाठी जात होता. त्यात गाडी चालविण्याचे शिकत असलेल्या नवख्या चालकाने त्यांना धडक दिली. त्यातच या अभागी भावाचा जागीच मृत्यू झाला. तर ज्या गाडीने त्यांना धडक दिली ती गाडी कळंब येथील बाराते यांची असून आठ दिवसां पूर्वीच त्यांनी गाडी खरेदी केलेली आहे. अमित बाराते हा त्याच्या दोन मित्रांना सोबत घेऊन गाडी शिकत होता. त्यात त्याचा भरधाव वाहनावरील ताबा सुटल्याने तो स्वतः मयत झाला तर मोटार सायकल वरील अमोल सत्वधर याचाही जीव गेला.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close