आपला जिल्हादेश विदेश

छ. संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल तयार करण्यासाठी नेटिझन्सची मोहिम

मुंबई ,– 14 मे रोजी छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या 363 व्या जयंतीनिमित्त गुगल नेत्यांचे खास डूडल तयार करावे यासाठी ट्विटरवर नेटिझन्सनी मोहीम सुरू केली आहे.

आपल्या कारकिर्दीत एकही लढाई न हरलेला योद्धा म्हणून संभाजी राजांना ओळखले जाते. या कार्याचा गौरव म्हणून यंदा छत्रपती संभाजी राजांच्या ३६३व्या जयंतीनिमित्त त्यांचे छायाचित्र असलेले डूडल प्रदर्शित करण्याची मागणी गूगलला करण्यात येत आहे. यासाठी संभाजीराजे_जयंती हे दोन हॅशटॅग वापरण्यात येत आहेत. ट्विटरवरील मोहिमेसोबतच गुगलच्या proposals@google.com या अधिकृत ई-मेलवर मेल पाठवून संभाजी महाराजांच्या डूडलची मागणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच शिव-शंभूप्रेमींनी आपल्या कल्पनेतील डूडल तयार करून #DoodleofSambhajiRaje या हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मोहीमही लवकरच सुरू करणार असल्याचे समजते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close