आपला जिल्हा

गुरुकृपा पेट्रोल पंपाची एच.पी कंपनीकडून तपासणी सुरू ,जनतेला न्याय मिळणार ? HP company starts inspection of Gurukrupa petrol pump, will people get justice?

बीड — चौसाळा च्या गुरुकृपा पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या भुसावर दरोडे घातले जात असल्याच उघडकीस आल्यानंतर ग्राहकांच्या सुविधांकडे पेट्रोल पंप मालकाने दुर्लक्ष करून पेट्रोल कंपनीच्या नियमांना पायदळी तुडवल्या चे वृत्त सह्याद्री माझा ने प्रकाशित केलं होतं. या वृत्ताची दखल घेत एचपी कंपनीचे कर्तव्यदक्ष सेल्स ऑफिसर प्रसाद सावजी यांनी पंपात होत असलेल्या घोटाळ्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.या तपासणीतून ग्राहकांना नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे ‌

गुरुकृपा पेट्रोल पंपावर गेल्या सहा महिन्यापासून ग्राहकांची लूट मोठ्या प्रमाणावर केली जात होते. मापात पाप करत पंपाचे मालक ग्राहकांच्या खिशावर दरोडा घालत होता. याबरोबरच महावितरणची वीज चोरी देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. सोबतच पेट्रोल पंपावर मोफत हवा, शुद्ध पाणी, पुरुष व महिलांसाठी शौचालयाची वेगळी सुविधा पुरवणं कंपनीच्या नियमाने पेट्रोल पंप मालकाला बंधनकारक आहे. गुरुकृपा पेट्रोल पंपावर या सर्व सोयी सुविधांची वानवा असल्याचं उघडकीस आला आहे. ग्राहकांची होणारी लूट तसेच कंपनीच्या नियमांना पेट्रोल पंप मालकाने दिलेला फाटा यासंदर्भात सह्याद्री माझा ने गेल्या सहा दिवसांपासून वृत्तमालिका सुरू केली होती. याची दखल घेत एचपी कंपनीचे सेल्स ऑफिसर सध्या पेट्रोल पंपाची तपासणी करत आहेत. यावेळी ते ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची पडताळणी करणार आहेत. या पडताळणीत पंप मालकाचा उघडकीस आल्यास पेट्रोल पंप आला सील करण्याची कारवाई देखील करण्यात येऊ शकते. कंपनी कडून होत असलेल्या कारवाईत सर्वसामान्य ग्राहकांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला जाऊ लागला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close