ब्रेकिंग

चोरट्यांचा पाठलाग करताना सहा. पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू Six while chasing thieves. Police sub-inspector dies of heart attack

लातूर — रात्रीच्या गस्तीदरम्यान घरफोडी करीत असलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमदखान पठाण यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.चोरट्यांचा पाठलाग करताना पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लक्ष्मी कॉलनी परिसरात. सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका घरात चोर शिरले. दार तोडल्याचा आवाज ऐकून शेजार्‍यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी लगेच एलसीबीची गाडी पोहचली. तिघे चोरटे होते ते मागच्या बाजूने पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग केला. अहमद खान पठाण वय 56 वर्ष हे पाठलाग करताना खाली कोसळले. त्यांना तत्काळ शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी आणि रूग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे अहमदखान पठाण यांचे पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच अहमदखान पठाण यांना शोक सलामी देण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, राखीव पोलीस निरीक्षक गफार शेख व पोलीस अमलदार उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close