ब्रेकिंग

चौसाळ्याच्या गुरुकृपा पेट्रोल पंपावर सुविधांची वानवा; ग्राहकांसोबतच महावितरण वर ही घातला जातोय दरोडा Lack of facilities at Chausala’s Gurukrupa petrol pump; The robbery is being carried out on MSEDCL along with the customers

बीड — पेट्रोलियम कंपनीच्या नियमाप्रमाणे हवा, शुद्ध पाणी शौचालयाची सुविधा आपत्कालीन परिस्थितीत फोनची सुविधा हे पेट्रोल ग्राहकांचे मूलभूत अधिकारांचा पालन कंपनी करणं गरजेचं असतं. पण या सर्व नियमांना एचपीच्या गुरुकृपा पेट्रोल पंपाने हरताळ फासली आहे. ग्राहकांच्या मापात पाप करून दरोडे घालणारा हा “झोड”गे महावितरणची विज देखील चोरून वापरत असल्याचं उघडकीस आला आहे. या वीज चोरीला आळा घालून संबंधित पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे

एचपी कंपनी ग्राहकांच्या मूलभूत अधिकारांची जाणीव ग्राहकांना करून देण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असते. पेट्रोल पंपाला देखील नियमांचं बंधन घालण्यात आलं असलं तरी याला गुरुकृपा पेट्रोल पंप अपवाद आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून पेट्रोल पंपाला मान्यता असली पेट्रोल पंपा मध्ये सुविधांची वानवा असली तरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत ग्राहकांच्या न्याय अधिकारावर काम केलं आहे. पेट्रोल पंपावर गाडीत हवा भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीन उपलब्ध असणं गरजेचं असतं येथे मोफत हवा भरण्याची सुविधा उपलब्ध केली जाते पण या पंपावर अशी सुविधा देण्यात आली नाही. या ठिकाणी ग्राहकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आर ओ किंवा वॉटर प्युरिफायर ची सुविधा फ्रिजर सह उपलब्ध करून देणे अनिवार्य असले तरी या पंपावर भंगारातलं फ्रिज दर्शनी भागावर ठेवला आहे त्यामध्ये बोअरच खारट पाणी भरण्यात येतो प्युरिफायर ची कुठलीही सोय करण्यात आली नाही. आपत्कालीन परिस्थितीत प्रथम उपचार करता यावा यासाठी प्रथमोपचार किट ठेवणे बंधनकारक आहे पण पंप चालकाला ही कशाला लागतं याच्यावरून काय अडल आहे. असं म्हणत या नियमाला देखील हरताळ फासली आहे. मोफत शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्याची गरज नियमात दिली असली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान चा नारा देत असले तरी मोदींच्या घोषणेला व कंपनीच्या नियमाला फाट्यावर मारण्यात आले आहे. पंपा भोवती मोकळे शेत-शिवार आहे तेथे जा मोकळे व्हा कशाला उगीच खर्चात पडायचं कंपनीला काय होतंय नियम घालायला असं म्हणत ही सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली नाही. फोनची सुविधा येथे उपलब्ध नाही. तो नेहमीच बंद पडलेला असतो. त्याच्यामुळे याचादेखील ग्राहकांना फायदा नाही. सोबतच आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्र वाळूच्या बादल्या आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. पेट्रोल-डिझेलची गुणवत्ता पाहायला मालक परवानगी देत नाही. पेट्रोल-डिझेलची घनता तपासायची कधी आवश्यकता वाटत नाही ग्राहकांना ही सुविधा न देता त्यांच्या शंकेचे निरसन केलं जात नाही. आता राहिला प्रश्न फिल्टर पेपरचा हे तर पंप मालकाच्या गावीही नाही. या सर्व गोष्टींचे तक्रार करायची तर तक्रार पेटी किंवा तक्रार रजिस्टर उपलब्ध करून दिले जात नसेल तर तक्रार करायची कशी ग्राहकांचे प्रश्‍न कंपनीला कळणार कसे असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पंपासाठी वापरली जाते चोरीची वीज
‘झोड’ पणाचा आणखी कळस म्हणजे पेट्रोल पंपाला लागणारी वीज चोरून वापरली जाते. पंपाच्या पाठीमागे असलेल्या ट्रांसफार्मर मधून आलेले कनेक्शन वीज मीटर मध्ये न घेता ते डायरेक्ट पंपा साठी वापरले जाते. त्यामुळे या ठिकाणी असणारे वीज मीटर शोभेची वस्तू बनली आहे. ग्राहकांच्या खिशावर दरोडे घालण्यावरच ही बाब थांबली नाही तर महावितरणला देखील लुटण्याचे काम केलं जात आहे. या पंपावर होत असलेल्या वीज चोरीची माहिती सर्वश्रुत आहे. संध्याकाळच्या वेळी आकडी टाकताना सगळेच पाहत असले तरी महावितरणच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित पेट्रोल पंप मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे. या वीजचोरीतून एखादी दुर्घटना घडली तर याला महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील ग्राह्य धरले जाऊ शकते. पंपावर सुविधांची वानवा असताना एचपी कंपनीचे अधिकारी अशा दुर्घटना जबाबदार राहणार का? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.कंपनीच्या सर्व नियमाला हरताळ फासून देखील आजपर्यंत एच पी कंपनीचे अधिकारी धृतराष्ट्राची भूमिका घेत पंप मालकाच्या कृत्यावर पांघरूण घालत आले आहेत. यापुढे ते काय कारवाई करतात कंपनी नियमानुसार पेट्रोल पंपाची मान्यता रद्द करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पेट्रोल पंपावर तात्काळ कारवाई करून पंप कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close