आपला जिल्हा

बीड जिल्हा रूग्णालयातील अग्निशमन यंत्र कुजल्याने बनले शोभेची वस्तु ,वेळेवर रिफिलिंगच नाही Beed District Hospital fire extinguisher rotted, decorative items, no timely refilling

बीड — जिल्हा रूग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा जानेवारी मध्ये भंडारा येथील जळीतकांडा पासून काहीही बोध घेण्यास तयार नसुन केवळ शोभेची वस्तु म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयात बाह्यरूग्णविभागात लावलेले अग्निशमन यंत्र खालच्या बाजुने कुजले आहे. तर रिफील तपासून रिफिलिंग करण्याची गरज असून फेब्रुवारी महिन्यात रिफिलिंग करण्याची गरज असताना ८ महिने झाले तरी रिफिलिंग केलेले दिसून येत नाही.त्यामुळेच शासकीय रूग्णालये, ग्रामिण रूग्णालय तसेच प्राथमिक केंद्र यांच्यासह खाजगी रूग्णालयातील फायर ऑडीट व इलेक्ट्रिक ऑडीट न करणा-या रूग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड तसेच उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.

शासकीय कार्यालयात फायर ऑडीट व ईलेक्ट्रीक ऑडीट न केल्याबद्दल जबाबदार आधिका-यांवर कारवाई करा
बीड जिल्ह्य़ातील शासकीय रूग्णालयातील बीड जिल्हा रूग्णालय, ग्रामिण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठीकाणी दि.१० जानेवारी २०२१ रोजि भंडारा येथील जिल्हा ग्रामिण रूग्णालयातील जळीतकांड प्रकरणानंतर केलेल्या विविध चौकशीत बीड जिल्हा रूग्ण्लयाचे ६ वर्षापासून फायर ऑडीट नसणे तसेच दोन वर्षापुर्वी रेकॉर्ड रूमला आग लागून सुद्धा फायर ऑडीट न करणे आदि संशयास्पद प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी दि. १८ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु आजही त्याप्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात आलेली नसुन अग्निशमन यंत्राची दुरावस्था तसेच नादुरूस्त अग्निशमन यंत्रे जिल्हा रूग्णालयासह विविध शासकीय विभाग ऊदाहरणार्थ पाटबंधारे विभाग, समाज कल्याण विभाग, दुय्यम निबंधक, रजिष्ट्री कार्यालयात दिसून येत असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close