आपला जिल्हा

चौसाळा गुरुकृपा पेट्रोल पंप मालकाचा असाही ‘झोड ‘ पणा! दरोडे घालण्यासाठी पंपाला बसवली इलेक्ट्रॉनिक चीप Chausala Gurukrupa Petrol Pump Owner’s ‘Zhod’! Electronic chips installed in the pump for robbery

·बीड — चौसाळ्याच्या गुरुकृपा पेट्रोल पंपाच्या चिंधीचोर ” झोड ” गे ने लिटरमागे 28 रुपयांची ग्राहकांची लूट करण्यासाठी अनोखा फंडा वापरात आणल्याचं आता समोर येऊ लागला आहे. वाहनात पेट्रोल टाकणाऱ्या डिस्पेंसर मध्ये इलेक्ट्रॉनिक चिप बसवली असल्याची शक्यता आता वर्तविली जावू लागली आहे. या चीप मुळे टाकीत पेट्रोल पडायचे बंद झाले तरी मीटर रिडींग सुरूच रहात असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम विभागाकडून उत्तर प्रदेशात पंपांची तपासणी केली असता ही बाब उघड झाली होती. अशीच तपासणी मोहीम राबविण्यात यावी व जनतेची होणारी लूट थांबवावी अशी मागणी होऊ लागली आहे.

जनतेची लूट थांबवण्यासाठी ” सह्याद्री माझा ” शेवटपर्यंत पाठपुरावा करणार

गुरुकृपा पेट्रोल पंपावर दीड वर्षापासून सर्वसामान्य जनतेची होत असलेली लूट “सह्याद्री माझा” ने उघडकीस आणली. ही लूट कायमस्वरूपी बंद व्हावी, पंप मालकावर कडक कारवाई व्हावी. पुन्हा अशा चोऱ्या करण्याची हिंमत कोणाची होऊ नये यासाठी शेवटपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या प्रकरणी सह्याद्री माझाने बीड चे एच पी कंपनीचे सेल्स ऑफिसर ‘प्रसाद सावजी’  यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी पंपा विरोधात कडक कारवाई करून पंप सील करण्याचे आश्वासन दिले आहे. आता ही कारवाई कधी होते यावर आम्ही विशेष लक्ष ठेवून आहोत…‌‌

चौसाळा बायपास वर एच पी कंपनीचा असलेला गुरुकृपा पेट्रोल पंप सध्या वाहन धारकांची करत असलेल्या लुटीमुळे चर्चेत आला आहे. महागाईच्या काळात ग्राहकांच्या खिशावर दरोडा घालत पेट्रोल पंप मालक स्वतःच्या नावापुढे खानदानात नसलेले पाटील नाव धारण करु लागला आहे. पण रक्तात नसलेले हे पाटील पण ग्राहकांच्या खिशावर दरोडे घालून कसं मिळणार? असं जनतेत चर्चिल जाऊ लागला आहे. नफेखोरीच्या नादात नावात असलेलं ‘झोड’ (पणा ) गे कर्तबगारीने सिद्ध करून दाखवले. डोम कावळ्याने गरुडाची बरोबरी करण्यासाठी कितीही जीवाचा आटापिटा करण्यासाठी ‘पाटील’ नाव लावलं तरी बरोबरी कधीच होत नसल्याचं शेवटी केलेल्या नावातल्या ‘झोड ‘गे पणातून सिद्ध झालं.
पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट करण्यासाठी या पंप मालकाने वाहनात पेट्रोल टाकणाऱ्या डिस्पेंसर मध्ये चिप बसवलेली असल्याचं सांगितलं जाऊ लागला आहे. या चीपचे वैशिष्ट्य म्हणजे टाकीत पेट्रोल पडायचे बंद झाले तरी मिटर रिडींग मात्र सुरूच राहते. ही चीप दिल्ली कानपुर च्या बाजारात एक ते दोन हजार रुपयांना मिळत असल्याचं स्पष्ट झालं होतं. उत्तर प्रदेशातील काही पेट्रोल पंपावर हि चीप बसवल्याच आढळल्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम विभागाकडून राज्यातील सर्वच पेट्रोल पंपाच्या तपासणीची व्यापक मोहीम राबविली होती. या पंपावर देखील अशीच इलेक्ट्रॉनिक चीप बसविल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या पंपाची कसून तपासणी करण्यात यावी ग्राहकांची होणारी लूट थांबवावी, या पंपाला कायमस्वरूपी सील करण्यात यावे पंप मालकाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close