ताज्या घडामोडी
महिलांविषयक प्रकरणांचा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण घेणार हिंगोलीत आढावा

हिंगोली — महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण दि. 19 व 20 मे, 2022 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दि. 19 मे, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्ह्यातील महिलाविषयक प्रकरणाचा त्या आढावा घेणार असून यात निर्भया पथक, महिला सेल, जिल्ह्यात विविध विभागातर्फे महिलांविषयक राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती घेणार आहेत.