आपला जिल्हा

दिवाळीच्या दिवशीच बसचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न Bus driver attempts suicide on Diwali

कडा — एसटी कर्मचार्‍यांमध्ये आत्महत्यांच चांगलंच लोन पसरल असल्याचं चित्र सध्या पहावयास मिळत आहे.जामखेड-पुणे बस चालकाने कडा बसस्थानकात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत चालकाला आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
बाळू महादेव कदम 35 वर्षे रा.आष्टी असे बस चालकाचे नाव आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आष्टी येथील बाळू महादेव कदम हे गेल्या तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. आज दुपारी आष्टी आगारातून जामखेड-पुणे बस क्र. MH 20,BL 2086 घेऊन ते निघाले. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान, चालक बाळू कदम यांनी बसस्थानक परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले. चालक कदम यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, वाहतुक नियंत्रक आलिशा बागवान, मुन्ना रावल, सुरेश खंदारे आणि वाहक यांनी त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांनी विषारी द्रव्य प्राशन का केले याचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान आगार प्रमुखांनी कर्तव्यावर यावेच लागेल अन्यथा कार्यमुक्त करण्यात येईल अशी धमकी त्यांना दिली होती. असा आरोप बस चालकाचा भाऊ संतोष कदम यांनी केला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close