देश विदेश

🎆 हातात कटोर देण्याच्या तयारीत असलेल मोदी सरकार पोटनिवडणुकांमूळे भानावर आलं ; पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त 🎆 The Modi government, which was ready to hand over the bowl, came to its senses due to the by-elections; Petrol is cheaper by Rs 5 and diesel by Rs 10

नवी दिल्ली — जनतेने काल झालेल्या विविध राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये मोदी सरकारला चारी मुंड्या चीत करताच भानावर आलेल्या मोदी सरकारने पेट्रोलमध्ये पाच रुपयांची तर डिझेलमध्ये दहा रुपयांची दर कपात केली आहे. 3 नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून ही दर कपात लागू होणार आहे.
जनतेने पोट निवडणुकीमध्ये भाजपला चांगलाच दणका दिला. जनतेच्या हातात कटोरी देण्याच्या विचारात असलेले मोदी सरकार काही प्रमाणात भानावर आले आहे. या पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचे खापर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी महागाईवर त्यातही विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर फोडले होते.
.
या निवडणूक निकालाच्या दणक्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे दर कमी झाले तरी पेट्रोल शंभरच्या वरच राहणार आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत या दरवाढीचा फटका बसण्याचा धोका लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने यावर तातडीने पावले टाकली आहेत. दर कपात केली असली तरी ग्राहकांना पेट्रोल शंभर रुपयापेक्षा अधिक दरानेच मिळणार आहे. या दर कपातीचा फायदा महागाई कमी होण्यात होणार नसला तरी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पुण्यासारख्या शहरात पेट्रोल आता 115.52 रुपयांवरून 110 रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेल हे 104.67 पैशांवरून पुन्हा शंभर रुपयांच्या आत म्हणजे 94 रुपये प्रति लिटरने मिळेल. हे दर तीन नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. या आधी केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्यास नकार देत होते.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close