महाराष्ट्र

शंभर कोटी वसूली प्रकरणात सीबीआयकडून पहिली अटक.First arrest by CBI in Rs 100 crore recovery case

मूंबई — राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंगांनी 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे.
या केसमध्ये सीबीआयने पहिली अटक केली आहे. सचिन वाझेच्या या प्रकरणात अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. हे प्रकरण पेटल्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी देशमुखांवर वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. तपासादरम्यान, संतोष जगताप या मध्यस्थाला ठाण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी रिपोर्ट्स लीक केल्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांचे वकील आनंद डागा आणि एका सीबीआय अधिकाऱ्याला अटक झाली होती. आता संतोष जगताप याला अटक झाली आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका पार पाडत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याला तत्काळ 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close