क्राईम

बुलढाणा अर्बन बँक दरोडा: गेवराई पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या Buldhana Urban Bank robbery: Gevrai police nab the accused

शहागड —- येथील बुलडाणा अर्बन बँकेच्या शाखेवर गुरुवारी पाचच्या सुमारास फिल्मी स्टाईल दरोडा पडला होता. पिस्तूल असलेल्या तीन दरोडेखोरांनी 25 लाखांची रोख रक्कम व तारण केलेल्या ग्राहकांचे जवळपास 70 लाख रुपयांचे सोने पळवले होते. दिवसाढवळ्या पडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावण्यात गेवराई पोलीस व जालना स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून दोन दरोडेखोरांच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहेत. तर अन्य एक जणाचा शोध पोलिस घेत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेत गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकला. हा प्रकार घडला तेव्हा बँकेत दोन क्लर्क, दोन कँशिअर, दोन शिपाई, एक मॅनेजर हजर होते. बंदुकीचा धाक दाखवून तिघे बँकेत आले. नंतर बँकेतील सर्वांना बंदुकिचा धाक दाखवून एका जागेवर बसवले. यावेळी शाखाप्रमुख गणेश खापरे, निखिल जावळे क्लर्क, कॅशिअर विकास बांग, सोने तारणचे इंगळे हे कर्मचारी उपस्थित होते. दरोडेखोर कॕशीअर प्रमोद पुंडे यांना लॉकरकडे घेऊन गेले, व रोख रक्कम 25 लाख रूपये व सोने तीन लाॉकरमधून अंदाजे 70 लाखांचे सोने घेऊन बँकेच्या बाहेर त्यांची उभा केलेल्या विनाक्रमांकाच्या दूचाकीवरुन पसार झाले होते.

या दरोड्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजबळ, गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पथक तैनात केले होते. दरम्यान या दरोड्याती आरोपीची माहिती गेवराई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप काळे यांना लागल्यानंतर त्यांनी दोन आरोपींना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले.

असा लावला छडा….
गेवराई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप काळे यांना गुप्तहेरामार्फत माहिती मिळाली की, गेवराई येथील एका जणाने त्याच्या बीडच्या राहत्या घरी गोणीमध्ये पैसे व सोने लपवून ठेवले आहे. यानंतर संदीप काळे यांनी शहानिशा करुन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड तसेच जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने यातील एका आरोपीला गेवराई बायपासवरुन तर दुसऱ्या एका आरोपीला संजयनगर मधून ताब्यात घेतले. तर बीड येथील घरात दडवून ठेवलेली रक्कम व सोने जप्त केले. यामधील एक आरोपी गेवराई ह.मु.बीड, दुसरा माजलगाव तर तिसरा यवतमाळ येथील आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close