आपला जिल्हा

बीड : 6 ठाणे प्रमुखांच्या बदल्या ! Beed: 6 Thane chiefs transferred!

बीड — जिल्हा पोलीस दलातील सहा ठाणेप्रमुखांच्या बदल्यांचे आदेश बुधवार दि.27 ऑक्टोबर रोजी काढण्यात आले. पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या नेमणुका पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी दिलेल्या आहेत
पोलिस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशात परळी शहरचे पो नि.हेमंत पोपटराव कदम, माजलगाव ग्रामीणचे पो नि.संतोष उत्तमराव पाटील तसेच पेठ बीड ठाण्याचे पो नि.विश्वास रामचंद्र पाटील यांना नियंत्रणक कक्षात नियुक्ती देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात असलेले पोनि.उमाशंकर मन्मथ अप्पा कस्तुरे यांची परळी शहर ठाणे, पो नि.प्रकाश विश्वनाथ मुंडे यांची माजलगाव ग्रामीण तर धारुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार माणिकराव पालवे यांची पेठ बीड ठाणे (प्रभारी म्हणून) नियुक्तीचे आदेश बुधवारी दिले आहे. तसेच ज्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे त्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे असे देखील सांगण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close