आपला जिल्हा

पुरवठा विभागातील 5 हजार रेशनकार्ड गायब प्रकरणात गुन्हे दाखल करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे File a case in the case of disappearance of 5,000 ration cards from the supply department

बीड — जिल्हा पुरवठा विभागातुन 5 हजार रेशनकार्ड गायब प्रकरणात संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच हंगामी वसतिगृहे तात्काळ सुरू करण्यात या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, अन्न न नागरी पुरवठा मंत्री, सचिव तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हा पुरवठा विभागातुन 5 हजार रेशनकार्ड गायब प्रकरणात विभागीय आयुक्तांनी आदेश देऊन अडीच महिने उलटुन सुद्धा गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधित दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. तसेच 3 वर्षापासून प्रभारी जिल्हा पुरवठा आधिकारी पदी कायमस्वरूपी जिल्हा पुरवठा आधिकारी पद नियुक्त करण्यात यावे. तसेच ऊसतोड मजुर कारखान्यावर गेले असून त्यांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतिगृहे तात्काळ सुरू करण्यात यावीत, ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यास कुचराई करणारांवर कारवाई करण्यात यावी आदि मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर,सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, शिवशाहु ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, मराठवाडा उपाध्यक्ष ऑल इंडीया पॅथर सेनेचे नितीन सोनावणे ,ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव, ऊसतोड कामगार वाहतुक मुकादम युनियन नेते डाॅ.संजय तांदळे, मोहम्मद मोईनोद्दीन, शेख शहानवाज आदि सहभागी होते.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close