आपला जिल्हा

बीडच्या शिंदे नगर मध्ये दरोडा; रोख रकमेसह नऊ लाखाचा ऐवज लंपास

बीड — घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
कपाटातील सोन्या – चांदीचे दागिने , दिड लाख रूपयांची रोख रक्कम असा एकूण 8 लाख 85 हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज पहाटे शहरातील शिंदेनगर भागात उघडकीस आली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.


बीड शहरातील राजासाहेब हॉटेलचे मालक धनंजय अरूणराव जगताप हे 24 ऑक्टोंबर रोजी सकाळी घराला कुलूप लावून आईला आणण्यासाठी पुणे येथे गेले होते . आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास ते आईला घेवून पुणे येथून घरी शिंदेनगर येथील घरी पोहचले असता त्यांना गेटचे कुलूप तुटलेले दिसले .

आतमधील घराचा दरवाजा ही उघडा होता . घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले . अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या – चांदीचे दागिने व दिड लाख रूपयांची रोख रक्कम असा एकूण 8 लाख 85 हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले . याची माहिती शिवाजीनगर ठाण्याला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली . याप्रकरणी धनंजय जगताप यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close