ब्रेकिंग

“राजा” च्या “लुच्चे “गिरी चा लोकप्रतिनिधींनी शरद पवारां समोर वाजवला बाजा, पवारांनीही व्यक्त केली नाराजी People’s representatives play “Raja” ‘s “Luchche” Giri in front of Sharad Pawar, Pawar also expressed displeasure

बीड — पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राजकिय ताकद पणाला लावत राजा रामा स्वामीस मोठ्या अट्टाहासाने बीडच्या पोलीस अधीक्षक पदी आणलं यातून त्यांना फायदा काय झाला हे त्यांनाच माहित पण कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले.सर्वसामान्यांना न्याय मिळणं अवघड झालं. राजाच्या पोलिसांनी माफियांचे पाय चाटण्यात धन्यता मानली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची देखील यातून कोंडी झाली.पापा मोदींनी गूरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तिकडे प्रवेशाचा कार्यक्रम सुरू होता आणि अन् इकडे बीड राष्ट्रवादीचे नेते राजा रामा स्वामीच्या नंगा नाचाचे वाभाडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर काढू लागले. मोदींच्या प्रवेशाने बेरजेचे राजकारण झाले असले तरी लोकप्रतिनिधींच्या नाराजीचा परिणाम उद्या वजाबाकी चा राजकारणात होऊ नये यासाठी शरद पवारांनी देखील राजाच्या कार्यशैलीवर चिंता व्यक्त केली.

गुरुवार दि.21 ऑक्टोबर रोजी राजकिशोर मोदी यांनी मुंबईत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे प्रवेशाचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे बीड राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली. या बैठकीच्या सुरुवातीला शरद पवार यांनी जिल्ह्यातील देवस्थान जमिन घोटाळा प्रकरणी अडकलेले दोन वरिष्ठ अधिकारी त्यांच्याविषयी प्राप्त तक्रारी व हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. सोबतच पोलीस अधीक्षक राजारामास स्वामी यांची कार्यशैली चांगली नसल्याच त्यांनी म्हणताच राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याने राजा रामा स्वामीच्या तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणं किती अवघड झाला आहे कायदा-सुव्यवस्थेची कशी वाट लागली आहे याचा त्रास लोकप्रतिनिधींना कसा होऊ लागला आहे. माफिया राज्य निर्माण होऊन पोलीस यंत्रणा कशी‌ माफियांचे पाय चाटत आहे याचा पाढा वाचायला सुरुवात केली. पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना बीडमध्ये आणण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावली. पण सर्वसामान्यांचे जीवन अवघड होऊन बसलं. राजा रामा स्वामी सात – आठ तारखेच्या दरम्यान पोलीस ठाण्यांना फोन करून ठाणे प्रमुखांकडे हप्त्याची आठवण करून देत असल्यामुळे यातून ठाणे प्रमुखांची कोंडी होऊ लागली आहे “राजा”ची पैशाची भूक “बकासुरा ” सारखी असल्यामुळे तिची पूर्तता करता करता ठाणे प्रमुखांची नाकेनऊ येऊ लागली आहे. परिणामी त्यांना देखील मनाला पटत नसलं तरी अवैध धंद्यांना अभय द्यायची वेळ आली. सर्वसामान्यांच्या हक्काचा यातून चुराडा होत असल्याचं दिसत असलं तरी नाविलाज होऊ लागला आहे. शेवटी बॉस इस अल्वेज राईट ( Boss is always right) असं म्हणण्याची वेळ आली आहे. परिणामी महिला अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे बनावट दारू, मटका जुगार अड्डे, वाळू तस्करी गुटखा तस्करी यासारख्या धंद्यानी यशोशिखर गाठलं आहे.विशेष म्हणजे माध्यमांच्या टीकेला ठाणे प्रमुखांना सामोरे जावे लागत आहे. बदनाम ठाणे प्रमुखांना अभयदान देण्याचं काम मात्र राजा रामा स्वामी प्रामाणिकपणे करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी कधीच एकाही कर्मचाऱ्यावर कधी कारवाई केली नाही हे विशेष!
हे झालं सर्वसामान्य जनतेचं पण याचा त्रास राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील होऊ लागला आहे. सर्वसामान्य माणूस नेत्यांचे दरवाजे ठोठावू लागला आहे. पक्षा विषयी नाराजी व्यक्त करू लागला आहे. याचा त्रास निवडणुकांमध्ये होऊ नये याची चिंता लोकप्रतिनिधींना वाटू लागली आहे. जनाधार घटण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी राजकीय सारीपाटावर राजा रामा स्वामी ची चाल खेळली असली तरी, यातून त्यांना फार मोठा फायदा झाला असला तरी पक्षातील लोकांची राजकीय कोंडी करण्यात ते यशस्वी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक नेत्याने राजा रामा स्वामी बद्दलची आपली नाराजी दिलखुलास पणे शरद पवारां समोर मांडली. हा विषय थोरल्या पवारांसमोर जवळपास पाऊण तास चालू होता. या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रवेशाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने गैरहजर होते.हा विषय संपत आल्यानंतर धनंजय मुंडे बैठकीत हजर झाले. त्यावेळी शरद पवारांनी देखील राजा रामा स्वामीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे येणाऱ्या काळात पवार साहेब काय भूमिका घेतात राजा रामा स्वामीची बदली होते की धनंजय मुंडें ची कोंडी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र “राजा” सारख्या साडेसाती च्या फेऱ्यातून पवार साहेबांनीच सूटका करावी अशी मागणी होऊ लागली आहे

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close