क्राईम

पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोरांचा महाराष्ट्र बँकेवर भर दूपारी दरोडा Five to six armed robbers attack Maharashtra Bank in the afternoon

पूणे — शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत बँकेतील ३१ लाख रुपये रोकड तसेच दोन कोटी रुपयांचे सोने चोरी गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.पाच ते सहा दरोडेखोर दुपारच्या सुमारास चारचाकी वाहनातून येऊन बॅकेत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवत बँकेतून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बँकेवर दरोडा टाकण्यात आल्यानंतर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांना महत्वाचा संदेश पाठवण्यात आला आहे. दरोडेखोर 25-30 वयोगटातील असल्याचं बोललं जात आहे. अचानक दीड वाजेच्या दरम्यान पांढऱ्या कलरच्या सियाज कारमधून आलेले पाच ते सहा जण गाडीतुन उतरुन बॅंकेत शिरले.एक जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले. त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या.त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी घेऊन कार गाडीमधून पलायन केले. या गाडीवर प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता.

पिंपरखेडपासून शिरूर पोलिस स्टेशन सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. घटना समजताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत घटनास्थळी हजर झाले.
पुणे व नगर जिल्ह्यांची नाकाबंदी करण्यांची सुचना देण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close