राजकीय

काँग्रेस नेते राजकिशोर  मोदींचा राष्ट्रवादीत प्रवेश Congress leader Rajkishore Modi joins NCP

राजकिशोर मोदींच्या प्रवेशाने बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होईल – ना. अजितदादा पवार

मुंबई — बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाईची नगर परिषद अनेक वर्षांपासून एकहाती ताब्यात ठेवलेले राजकिशोर (पापा) मोदी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल असा विश्वास उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी यांनी त्यांचे शेकडो सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार , राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ना. अजितदादा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. आज नव्याने पक्षप्रवेश झालेले पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांची विचारसरणी देखील समान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाईट काळात सोबत राहिलेले जुने कार्यकर्ते यांच्यावर कोणताही अन्याय न होऊ देता, जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन जिल्ह्यात एकजुटीने पक्षावाढीसाठी काम करू असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

व्यासपीठावर ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. धनंजय मुंडे, ना. संजय बनसोडे यांच्यासह आ.सतिषभाऊ चव्हाण, आ. संजय भाऊ दौंड, आ. संदीप भैय्या क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, मा.आ. बसवराज पाटील, मा.आ. पृथ्वीराज साठे, मा.आ.सय्यद सलीम, मा.आ. राजेंद्र जगताप, मा.आ. संजय वाघचौरे, रा.कॉ. बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, रा.कॉ.औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, रा.यु.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राजेसाहेब चव्हाण, शिवाजी सिरसाट, सुरज चव्हाण, भाऊसाहेब तरमळे तसेच राजकिशोर मोदी व विजय चव्हाण यांच्यासमवेत प्रवेश केलेले सर्व सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.

*यांचा झाला पक्षप्रवेश…*

अॅड . विष्णूपंत सुभानराव सोळंके,
मनोज मोहनलाल लखेरा, महादेव निवृत्तीराव अदमाने, वाजेद खतीब, धम्मपाल सरवदे, सुनिल सुरेशराव व्यवहारे, अमोल विजयकुमार लोमटे, दिनेश मोतीलाल भराडिया, संतोष रानबा शिनगारे, प्रकाशचंद्र बालचंद सोळंकी, प्रा. वसंतराव बळीराम चव्हाण, हाजी महेमूद साहब, अरुण रामकृष्ण काळे, किशोर मुन्नालाल परदेशी, विजयकुमार शिवनारायण लखेरा, शेख खालेद ताहेर, चाऊस शेख, दगडूभाई समियोदीन खतीब, अशोक भागूराम जेथे, राजेंद्र विठ्ठलराव मोरे, गणेश शंकरराव मसने, डॉ . राजेश मधूकरराव इंगोले, शेख जमील भाई, महादेव धांडे, अजयसिंह दिख्खत, शिवाजी तुळशीराम गायकवाड, माणिक शेषेराव वडवणकर, रूपेश चव्हाण, सारडा कचरु हिरालालजी, वाघाळकर सुनिल बाबूराव, राणाप्रताप दगडू चव्हाण, गोविंद लिंबाजी पोतंगळे, औदुंबर अविनाशराव मोरे, सचिन विलासराव जाधव, रशीद खान पठाण ( सुगांव ), दिनेश घोडके, भारत बालासाहेब जोगदंड, महेबूब गवळी, मुख्तार शेख, जावेद गवळी, रफिक गवळी, शेख अनिस गुत्तेदार, कैलास नाना काबंळे, चंद्रकांत व्यंकटराव महामुनी, विशाल बबूवान पोटभरे,अॅड . सतिश घोगरे, अकबर पठाण, अश्विन सांवत, अशोक राजाराम देवकर, यांसह विविध तालुक्यातील पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आदींचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश यावेळी केला.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close