आपला जिल्हा

पलटी झालेल्या ट्रक वर आठ वाहने धडकली, लहान मुलीचा मृत्यू तर दोन जखमी Eight vehicles collided with the overturned truck, killing the girl and injuring two others

बीड — धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोळवाडी जवळ नारळ घेऊन जाणारा ट्रक पलटल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. याच दरम्यान भरधाव वेगात येणार्‍या सिमेंटच्या ट्रकने तिथे उभे असलेल्या दोन रिक्षांना जोराची धडक दिली या अपघातात 13 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या पाठोपाठ अन्य तीन ते चार वाहने अपघातग्रस्त वाहनांवर धडकले. त्यात मदत कार्य करणार्‍या एका पोलिसालाही वाहनाने जोराची धडक दिल्याने तोही जखमी झाला. हा सर्व प्रकार केवळ या भागामध्ये सर्व्हीस रोड (पर्यायी रस्ता) नसल्याने झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पर्यायी रस्ता द्या, अशी मागणी गावकर्‍यांकडून केली जात आहे.


गूरुवारी पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास नारळ घेऊन जाणारा ट्रक क्र. एच.आर.55 बी.ई. 8397 हा कोळवाडी जवळ आला असता तो पलटला. याची माहिती महामार्ग पोलिसांसह आयआरबीच्या कर्मचार्‍यांना मिळाल्यानंतर त्याठिकाणी महामार्ग पोलिस पीएसआय यशराज घोडके आणि त्यांचे कर्मचारी हे मदत कार्यासाठी तेथे आले होते. मदतकार्य सुरू असताना तेथे रिक्षा क्र. एम.एच. 23 ए.आर. 0468 तसेच भाजीपाला घेऊन बीडकडे येणारा रिक्षा क्र. एम.एच. 23. एक्स 5470 व कार क्र. एम.पी.68सी.2618 रस्त्याच्या बाजुला उभे होते. या वेळी सिमेंट घेऊन येणारा ट्रक क्र. एम.एच. 18 ए.ए. 9679 रिक्षा व कारला धडकला. या वेळी एका रिक्षात बसलेली वैष्णवी आनंद आडागळे रा. शाहूनगर बीड, वय 13वर्ष हिचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. धनंजय बापू वाघमारे वय 39 वर्षे रा. पाली हे जखमी झाले आहेत व दुसर्‍या रिक्षातील रविंद्र नवनाथ ढाकणे वय 45 वर्षे रा. ढाकणवाडी ता. केज हे जखमी झाले आहेत.


या वेळी अपघातग्रस्तांना मदत करत असलेले अमलदार विलास यादवराव ठोंबरे हे जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. याच वेळी दोन दुचाकीही या पलटी झाल्या आहेत. एकावर एक आठ वाहने आदळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग पोलीसांनी मदत करत एकाबाजुने वाहतूक सुरू केली. त्यानंतर साडेचार वाजता सोलापूरकडून औरंगाबादकडे येणारा ट्रक क्र. आर.जे. 14 जी.के.0598 हा भरधाव वेगाने येऊन पलटी होऊन बीड-सोलापूरकडे जाणारा ट्रक क्र. एम.एच. 23 ए.यू. 9500 या ट्रकवर जावून धडकला. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आयआरबीच्या क्रेनने दोन्ही ट्रक बाजुला काढून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान आयआरबीच्या वतीने कोळवाडी येथे सर्व्हीस रोड न केल्याने महामार्गावर दिशादर्शक फलक न लावल्याने आणि पथदिवे नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे कोळवाडी ग्रामस्थ वरील मागण्यांसाठी आंदोलन करणार आहे

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close