ब्रेकिंग

” वमने ” ( उलट्या) ला रुजू करून घेण्यासाठी यंत्रणेतली भ्रष्टाचारी पिलावळ, वाळू, धान्य माफिया सक्रिय Corruption in the system to revive “vomiting”, sand, grain mafia active

बीड — तहसीलदार वमने याने केलेल्या अंदाधुंद कारभाराचा फटका सर्वसामान्य गोरगरीब जनतेला बसला. तहसील कार्यालयाला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणाने केलं. वाळू माफिया, गौण खनिज माफीया धान्य माफिया यांची मदत करत स्वतःची तुंबडी भरली. तांदळवाडी प्रकरणात तर अक्षरशः हजार-दोन हजार रुपयांमध्ये आपली इमानदारी वमने ने विकल्याचं पाहायला मिळालं प्रकरण अंगाशी येताच दीर्घ रजा टाकून पळपुटेपणा ची भूमिका घेतली. मात्र सर्व परिस्थिती स्थिरस्थावर होताच आशा या कर्तव्यदक्ष पळपुट्या वमनेच्या हाती तहसीलदार पदाची सूत्र यावी यासाठी पुरवठा अधिकारी सागरेबाई यांच्यासह भ्रष्टाचारात गुंतलेली लाॅबी सक्रिय होत ताकद पणाला लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर वमने देखील लग्न पत्रिका वाटप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व राजकीय मंडळीच्या भेटीगाठी घेऊन स्वतःला अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व आशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

बीडचे तहसीलदार शिरीष वमने यांनी तहसील चा कारभार स्वतःच्या नावात असलेल्या वमन म्हणजेच उलटी ( ओकारी) येईल असा कारभार करत गोरगरिबांच्या मुंड्या मोडायला सुरुवात केली. वाळू माफियांकडून हप्ते बांधून घेतले. अवैध उत्खनन करणाऱ्या गौण खनिज माफियांना पैशाच्या हव्यासापोटी मोकळे रान सोडून दिले. परिणामी या लोकांनी अक्षरशः हैदोस घालत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला इतकच नाही तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या रवी ठाणगे ला हाताशी धरून सप्टेंबर महिन्यात राशन दुकानदारांचे चलन भाडण्याचं काम करून घेतलं. तांदळवाडी सारख्या प्रकरणात ग्रामस्थांनी राशनचे धान्य पकडून देऊन देखील कुठलीच कारवाई केली नाही. उलट हजार दोन हजार रुपये घेऊन ग्रामस्थांनी पकडून दिलेल्या आरोपीला पाठीशी घालत पदाची व स्वतःची इज्जत घालविली. कारवाईच्या मागणीसाठी येथील जनतेला जलसमाधी आंदोलन करावे लागले. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्या नंतर प्रकरण अंगाशी येईल हे लक्षात येताच पळ काढला. जवळपास या प्रकरणावर आता पडदा पडलेला आहे. तहसील चा कारभार प्रभारी तहसीलदार डोके यांनी सुरळीत मार्गावर आणला असताना सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचारात गुंतलेली पिलावळ माफियांना हाताशी धरून शिरीष वमनेला पुन्हा तहसीलदार पदावर रुजू करून घेण्यासाठी सक्रिय झाले आहेत. तर खुद्द शिरीष वमने देखील बीड मध्ये दोन – तीन दिवसापासून ठाण मांडून आहेत.स्वतःच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्याच्या बहाण्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत परिस्थितीची चाचपणी करत आहेत. तर राजकारणी मंडळींना देखील साकडे घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरळीत चाललेला तहसील च्या कारभारात पुन्हा गू घाण होऊ नये सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा. त्यांच्या अधिकाराचा रक्षण व्हावं. त्यांच्या हक्काच धान्य त्यांना मिळावं यासाठी वमने सारख्या अधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close