क्राईम

पोहण्यासाठी बिंदुसरा धरणात गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू. Two youths drowned in Bindusara dam

बीड –बिंदुसरा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन 16 वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी घडली. मुले घरी आली नसल्याने याबाबतची तक्रार नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. पोलिसांनी याचा तपास केला असता सदरील मुलांची दुचाकी बिंदुसरा तलावाच्या जवळ आढळून आली. पोलिसांनी काही लोकांच्या मदतीने मध्यरात्रीच्या दरम्यान या मुलांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. हे मुले शाहूनगर परिसरातील शिंदेनगर येथील आहेत. या घटनेबद्दल परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
ओंकार लक्ष्मण काळे ( वय 16 ) व शिवसंतोष पिंगळे ( वय 16 ) दोघे राहणार शिंदेनगर कॅनाल रोड बीड हे दोघे काल दुपारी दुचाकीवर बिंदुसरा धरणावर गेले होते. मुले घरी आले नसल्याने याबाबतची तक्रार रात्री दहा वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. पोलीसांच्या तपासामध्ये मुले धरणावर गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस दाखल झाले होते. पोलीसांना मुलांची दुचाकी तलावाच्या जवळ आढळून आली. मुलं पाण्यात बुडाली असावीत, असा अंदाज आल्यानंतर काही लोकांच्या मदतीने पाण्यामध्ये शोध घेतला असता या दोघांचे मृतदेह आढळून आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. या प्रकरणी प्रथमदर्शनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या दुर्दैवी घटनेने शाहूनगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close