कृषीवार्ता

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. Two-wheeler killed in truck crash

आष्टी — वाघळुज घाटात ट्रक- दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. मकरंद भालेकर वय ३०वर्ष, रा. शेरी बुद्रुक असे मृत तरुणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील युवक मकरंद भालेकर हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास कड्यावरून नगरकडे दुचाकीवर चालला होता. दरम्यान, अहमदनगरवरून जामखेडकडे एक ट्रक क्र.एमएच 16 एवाय 8586 येत होता. दोन्ही वाहनांची वाघळूज घाटातील वळणावर समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील मकरंद याचा जागीच मृत्यू झाला. धडक एवढी जोरात होती की यात दुचाकीचा चुराडा झाला आहे. ऐन दसरा सणाच्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close