कृषीवार्ता

अतिवृष्टी: मराठवाड्यात सर्वाधिक 634 कोटींची मदत बीड जिल्ह्याला मिळणार Beed district will get maximum assistance of Rs 634 crore in Marathwada

बीड — मराठवाड्यात 47 लाख शेतकऱ्यांचे 36 लाख 62 हजार 782 हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे ( rain hits Marathwada ) नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी 2585 कोटी रुपयांची गरज एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे असतानाच बुधवारी राज्य शासनाने जाहीर केलेल्या 10 हजार कोटींच्या पॅकेजमधून विभागाला सुमारे 3700 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. 975 कोटी रुपये एनडीआरएफच्या निकषांच्या तुलनेत जास्तीचे मिळणार असून, बीड जिल्ह्याला सर्वाधिक 634 कोटींची मदत मिळणार आहे.

मराठवाड्यात 7 सप्टेंबर ते 7 आॅक्टोबरदरम्यान गुलाब वादळाच्या परिणामांसह झालेल्या अतिवृष्टीमुळे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र वाढले आहे. राज्यशासनाने 10 हजार कोटींचे पॅकेज तातडीची मदत म्हणून जाहीर केले असले तरी यात मराठवाड्यातील नुकसान पाहता 3700 हजार कोटी त्यातून मिळणे शक्य आहे. जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी 10 हजार, बागायतीसाठी 15 हजार तर फळपिकांसाठी 25 हजार हेक्टरी मदत राज्यशासन देणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 555 कोटी रुपये, जालना जिल्ह्यात जिरायती क्षेत्रासाठी 477 कोटी, परभणीत 338 कोटी, हिंगोलीत 294 कोटी, नांदेड 551 कोटी, लातूर 434 कोटी, उस्मानाबाद 305 कोटींची मदत मिळणार आहे. यात विभागातील 102 कोटी बागायत आणि 125 कोटी फळबागांच्या नुकसानीसाठी असणार आहे.

क्षेत्रनिहाय नुकसान 
जिरायती क्षेत्र : 25 लाख 34 हजार हेक्टरसाठी अंदाजे 3530 कोटी
बागायत क्षेत्र : 68 हजार 391 हेक्टरसाठी सुमारे 102 कोटी
फळपिकांचे क्षेत्र : 50 हजार 109 हेक्टर सुमारे 125 कोटी
एकूण क्षेत्र : 36 लाख 52 हजार हेक्टरसाठी 3700 कोटी

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close