क्राईम

मांजरसुंबा जवळ पोलिसांनी 34 लाखाचा गूटखा घेऊन जाणारे दोन ट्रक पकडले, Near Manjarsumba, police seized two trucks carrying gutkha worth Rs 34 lakh

नेकनूर — कर्नाटकहून बीडकडे दोन ट्रकमधून गुटखा येत असल्याची माहिती डीवायएसपी पंकजकुमार यांना झाल्यानंतर त्यांनी या दोन्ही गाड्या मांजरसुंब्या जवळ ताब्यात घेतल्या. या गाड्यांमध्ये तब्बल 34 लाख रूपयांचा गुटखा मिळून आला, या गुटख्याबरोबर दोन ट्रक असा एकूण 64 लाख रूपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
बुधवारी दुपारी मांजरसुंबा मार्गावरून गुटख्याने भरलेल्या दोन ट्रक जात होत्या. ट्रक मधून गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या दोन्ही गाड्या डीवायएसपी पंकजकुमार, नेकनूर ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख मुस्तफा, दीपक खांडेकर, सय्यद अब्दुल, मनोहर अनवणे, राऊत यांनी ताब्यात घेतल्या. या दोन्ही गाड्यात तब्बल 34 लाख रूपयांचा गुटखा आढळून आला. या गाड्या कर्नाटकहून बीडकडे येत होत्या. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुटखा कोणाचा आहे याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र गाडीसोबत पकडलेल्या आरोपींनी गुटका माफिया चे नाव घेतले असले तरी पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान बीड मधून इतर जिल्ह्यामध्ये गूटखा राजरोस पाठवलं जात आहे. पोलीस मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close