आपला जिल्हा

आर्थिक विवंचनेतून बस चालकाची आत्महत्या Bus driver commits suicide due to financial difficulties

बीड — गेल्या काही महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्यामुळे येथील अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. याच कारणामुळे नाशिक येथे बस मध्ये चालकाने आत्महत्या केली होती ही घटना ताजी असतानाच बीडमध्ये देखील बसचालकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
तुकाराम त्रिंबक सानप रा. अंकुश नगर बीड वय 42 वर्ष असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. सध्या एसटी कामगारांच्या पगारी वेळेवर मिळत नाहीत. ओव्हर टाईम काम करून देखील त्याचेही पैसे दिले जात नाहीत. आधीच तुटपुंजा पगार तोदेखील वेळेवर मिळत नसेल तर त्या कर्मचाऱ्यास अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. याच त्रासाला कंटाळून नाशिक येथे बसचालकाने बस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तरीदेखील एसटी कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. दरम्यान तुकाराम सानप हे आर्थिक संकटात सापडले होते. गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्या घराचा वीज पुरवठा बील न भरल्यामुळे खंडित करण्यात आला होता.सोमवारी सानप यांनी आपली ड्युटी प्रामाणिक पणाने पार पाडली. ड्युटी संपून घरी गेल्यानंतर त्यांनी अंकुश नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मयत सानप यांना एक चार वर्षाचा व एक ६ वर्षाचा असे दोन मुले आहेत.
तुकाराम सानप याचा अंत्यविधी आज सकाळी 10 वाजता त्याच्या गावी तागडगाव (दगडवाडी खलापुरी रोड फाट्यावरून मध्ये बेंदी) येथे होणार आहे. दरम्यान वेळेवर काम करून पगार मिळत नसेल तर संबंधित मंत्री व अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी बस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close