आपला जिल्हा

संपादक अजित वरपे यांना मातृशोक

बीड — दै . झुंजार नेताचे संस्थापक संपादक स्व . मोतीराम वरपे यांच्या पत्नी व स्व . रत्नाकर वरपे , संपादक अजित वरपे यांच्या मातोश्री श्रीमती शशिकला वरपे यांचे दीर्घ आजाराने आज दि 10 रोजी रात्री साडे सातच्या दरम्यान बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले

‌मृत्यूसमयी त्यांचे वय ८० इतके होते . त्यांच्या निधनाने वरपे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . त्यांच्या पश्चात एक मुलगा , मुलगी – जावई , सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे . त्यांच्या जाण्याने झुंजार नेता पुन्हा एकदा पोरका झाला असून दु : खद बाब म्हणजे आज स्व . मोतिरामजी वरपे दादा यांचा जयंतीदिनीच ही घटना घडली . उद्या दि . ११ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वरपे कुटुंबियांच्या दुःखात ” सह्याद्री माझा ” परिवार सहभागी आहे

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close